पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभ्यासिका व वाचनालयाचा द्वितीय वर्धापन दिन

Share this News
  • राजमाता अहिल्यादेवी वैदर्भीय धनगर समाज ट्रस्टचे आयोजन

दिघी दि.२४( सिटीनामा वृत्तसेवा)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभ्यासिका व वाचनालय द्वितीय वर्धापन दिनानिमित्य स्नेहमेळावा व श्री खंडोबा नंगरनिमित्याने जीवन गौरव सन्मान सोहळ्याचे आयोजन सोमवार दि.२६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभ्यासिका व वाचनालय फुगे वस्ती, भोसरी आळंदी रस्ता, दिघी, पुणे येथे जीवनगौरव समारंभ तसेच दुपारी १२ वाजता स्नेहमेळावा, वधू वर परिचय, सायंकाळी ५ पासून देवाची स्थापना जागरण, देवाचे लग्न व नंगर सोहळा संपन्न होत आहे.
यावेळी धनगर समाज महासंघ राज्याचे मा.अध्यक्ष व शेगाव तालुका संघचालक श्रीराम मोतीरामजी पुंडे यांना धनगर समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्याचबरोबर गजानन पातुर्डे लिखित हे मना या पुस्तकाचे प्रकाशन देखील होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राज्य वैचारिक प्रबोधन मंचाचे प्रमुख राजाभाऊ मुळे, होळकर घराण्याचे भूषणसिंहराजे होळकर, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष मा.प्रा.रामजी शिंदे, भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे, रा.स्व.संघाचे प्रांत सदस्य हेमंतराव हरहरे, आमदार संजयजी कुटे, आमदार गोपीचंदजी पडळकर, लेखणी सम्राट अशोकराव पातोंड, धनगर महासंघाचे उपाध्यक्ष शरद वसतकार, काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस रामविजय बुरुंगले यांचेसह अनेकविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजमाता अहिल्यादेवी वैदर्भीय धनगर समाज ट्रस्ट सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विदर्भ माळी समाज उत्कर्ष संघ भोसरी, विदर्भ मित्र मंडळ भोसरी, बारी समाज विकास ट्रस्ट पिंपरी चिंचवड, विदर्भ सहयोग मंडळ निगडी, छत्रपती संभाजी महाराज मंदिर समिती दिघी पुणे, श्री संत गजानन महाराज सेवाभावी ट्रस्ट , सार्वजनिक महाशिवरात्र उत्सव मित्र मंडळ महादेवनगर दिघी पुणे – १५ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *