अद्याप HSRP नंबर प्लेट नाही? ‘या’तारखेपासून दंडात्मक कारवाई..

Share this News

पुणे दि.६ (सिटीनामा वृत्तसेवा)
ज्या वाहनधारकांनी अद्यापही नवीन नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवली नाही त्यांच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे. १८ फेब्रुवारी २०२६ पासून ज्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नसेल त्यांच्यावर राज्य परिवहन विभाग कडक कारवाई करणार आहे. ज्यांनी ३१ डिसेंबर नंतर किंवा अद्यापही नोंदणी केली नसेल तर त्यांचेकडून १,००० एक हजार रुपये दंड आकारला जाणार असल्याची माहिती आहे.
वाहनांच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण असलेल्या नवीन नंबर प्लेटसाठी राज्य परिवहन विभाग सावध भूमिकेत आला आहे. ज्या वाहनधारकांनी ३१ डिसेंबर पर्यंत HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे पण अद्याप प्लेट बसवली नाही त्यांच्यासाठी राज्य परिवहन विभागाने १५ दिवसांची मुदत दिली आहे १८ फेब्रुवारी २०२६ नंतर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे वाहनधारकांनी लवकरात लवकर HSRP नवीन नंबरप्लेट बसवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *