पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील ०४ जणांचा समावेश

Share this News

दि.२५ जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी दि.२५ जानेवारी २०२६ रोजी देशातील विविध क्षेत्रातील ४५ मान्यवरांना पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.

पद्म पुरस्कार घोषित यादी –

भगवानदास रायकर (मध्य प्रदेश), ब्रिजलाल भट्ट (जम्मू-कश्मीर), चरण हेम्ब्रम (ओडिशा), चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश), डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू-कश्मीर), कोल्लक्कयिल देवकी अम्माजी (केरळ), महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा),नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा), ओथूवर तिरुथानी (तमिळनाडू), रघुपत सिंह (उत्तर प्रदेश), राजस्तापति कालीअप्पा गौंडर (तमिळनाडू), सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालैंड), थिरुवरूर बख्तवसलम (तमिळनाडू), अंके गौड़ा (कर्नाटक), डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश), गफरुद्दीन मेवर्ती (राजस्थान), खेम राज सुंद्रीयाल (हरियाणा), मीर हाजीभाई कसामभाई (गुजरात), मोहन नगर (मध्य प्रदेश), नीलेश मंडलेवाला (गुजरात), आर एंड एस गोडबोले (छत्तीसगढ़), राम रेड्डी ममिडी (तेलंगाना),सिमांचल पात्रो (ओडिशा), सुरेश हनागवाड़ी (कर्नाटक), तेची गूबिन (अरुणाचल प्रदेश), युनम जत्रा सिंह (मणिपुर), बुधरी ताथी (छत्तीसगढ़), डॉ. कुमारासामी थंगाराज (तेलंगाना), डॉ. पुण्णियामूर्ति नटेासन (तामिळनाडू), हैली वॉर (मेघालय),इंदरजीत सिंह सिद्धू (चंडीगढ़), के. पाजनिवेल (पुडुचेरी), कैलाशचंद्र पंत (मध्य प्रदेश), नुरुद्दीन अहमद (आसाम), पोकीला लेकटेपी (आसाम), आर. कृष्णन (तामिळनाडू), एस. जी. सुशीलेम्मा (कर्नाटक), टागा राम भील (राजस्थान), विश्व बंधु (बिहार), धर्मिकलाल चूनीलाल पांड्या (गुजरात), शफी शौक़ (जम्मू-कश्मीर)
(मिळालेल्या माहितीनुसार)

महाराष्ट्रातील ०४ भूमिपुत्रांचा समावेश –

लोककलेची सेवा करणारे कलावंत रघुवीर खेडकर, वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी श्रीमती अर्मिडा फर्नांडिस, कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानासाठी परभणी येथील शेतकरी श्रीरंग लाड आणि पालघरमधील वारली समाजाचे लोकसंगीत जतन व संवर्धन करणारे संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंगा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

उर्वरित पुरस्कार यादी जाहीर होत आहे ती लवकरच वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.

भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणते आहेत?
वाचा –

भारतरत्न हा सर्वांत उच्च दर्जाचा पुरस्कार आहे असून
पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर
पद्मश्री हा भारत सरकारकडून दिला जाणारा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

या क्षेत्रातील व्यक्तींना दिला जातो पुरस्कार –

शिक्षण, साहित्य, कला,क्रीडा समाजकार्य, प्रशासन, विज्ञान, उद्योग, व्यापार, आरोग्यसेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान जाहीर केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *