पुणे दि.२१ (सिटीनामा वृत्तसेवा)
हुतात्मा श्रीकांत लिंगायत यांचे स्मरणार्थ माहितीपट विमोचनाचा विशेष कार्यक्रम रविवार दि.२५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ६ दरम्यान प्रिव्ह्यू थिएटर ५ वा मजला, मुकुंदास लोहिया शैक्षणिक संकुल डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे विद्यापीठ (DESPU) शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक, अभिनेते दिग्पाल लांजेकर यांचे हस्ते माहितीपटाचे विमोचन होणार असून भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीपदादा रावत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीपराव क्षीरसागर, कै.श्रीकांत लिंगायत मेमोरियल ट्रस्टचे किशोर मेहता प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रकांत लिंगायत, प्यारेलाल चौधरी, राघवेंद्र अष्टेकर, अशोक तिडके, कै.श्रीकांत लिंगायत मेमोरियल ट्रस्ट, विवेक विचार मंच, राजे शिवराय प्रतिष्ठान यांनी केले आहे.
कोण होते हुतात्मा श्रीकांत लिंगायत ? संवैधानिक लोकशाही रक्षणार्थ आणीबाणीच्या विरोधात सत्याग्रह केल्याने १९ महिने तुरुंगवास भोगणारा देशभक्त, पुण्यातील लष्कर भागातील शिवजयंतीचा प्रणेता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक ऐन तारुण्यात जिहादी मॉब लिंचिंगचा बळी ठरला होता २६ जानेवारी १९८२ रोजी श्रीकांतवर जीवघेणा हल्ला झाला आणि १५ मार्च १९८२ रोजी श्रीरकांतची प्राणज्योत मालवली.
