भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ: देशव्यापी आंदोलन; आयुधनिर्माणी कर्मचाऱ्यांचे निवेदन

Share this News

देहूरोड दि.२६ (सिटीनामा वृत्तसेवा)
सरकारने २१ नोव्हेंबर २०२५ पासून नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची घोषणा केली परंतु सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या ५३ लाख कोटीच्या अर्थसंकल्पात त्यांच्या अंमलबजावणीसाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद केली नाही. देशाच्या प्रगतीत घाम गाळणाऱ्या कामगारांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे आउटसोर्स, स्कीम वर्कर गिग वर्कर या विविध नावाने कामगारांचे शोषण होत आहे. किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, बोनस इत्यादी कायदेशीर हक्क ही दिले जात नाही. खाजगी व औद्योगिक क्षेत्रात ईपीएफ १५ अंतर्गत फक्त १००० रु पेन्शन देत आहे. १९८९ पासून केंद्र व राज्य सरकार मध्ये भरती बंद केल्याने हजारो पद रिक्त आहे त्या ठिकाणी कंत्राटी कामगारांना नाममात्र वेतन देऊन राबवून घेतले जात आहे. कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठीचे व्यासपीठ म्हणजेच इंडियन लेबर कॉन्फरन्स गेल्या दहा वर्षांपासून बंद करण्यात आली आहे. यासह देशातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी आता सर्वांना रस्त्यावर उतरावे लागेल. भारतीय मजदूर संघाच्याच्या जगन्नाथ पुरी ओरिसा येथे झालेल्या अखिल भारतीय अधिवेशनातील निर्णयानुसार २५ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण देशभर मोर्चा व निदर्शने करण्यात आली.

या संदर्भात भारतीय संरक्षण कामगार संघ, आयुध निर्माणी, देहूरोड, पुणे यांच्या वतीने स्थानिक प्रशासनास बुधवार २६ फेब्रुवारी रोजी मुख्य महाप्रबंधक महोदय श्रीकृष्ण कुमार मौर्या यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री महोदयांस निवेदन (Memorandum) देण्यात आले.

या मागणीपत्राच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रातील व देशभरातील कामगारांच्या प्रश्नावर, प्रलंबित मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यात आले.यावेळी गोपाळ कारंजकर, केंद्रीय कार्यकारीणी सदस्य, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ व त्यांच्या कामगार प्रतिनिधी मंडळाने श्री कृष्ण कुमार मौर्या,IOFS,मुख्य महाप्रबंधक/OFDR यांच्याशी कामगारांच्या प्रमुख मागण्याबद्दल सविस्तर चर्चा केली व पंतप्रधान, भारत सरकार यांना निवेदन पाठविण्याचे विनंती केली.

यावेळी उपस्थित अखिलेश कुमार,IOFS, अप्पर महाप्रबंधक /OFDR ,बाठे साहेब, रमेश रमण, अध्यक्ष / BSKS प्रशांतकुमार नवाथे, महामंत्री/BSKS वैभव पाटील, संयुक्त महामंत्री/BSK
योगेश माळी, खजिनदार / BSKS, दिलीपकुमार झा, कार्यसमिती सदस्य निखिल तापकीर, कार्यसमिती सदस्य नीलेश जंगम,कार्यसमिती सदस्य तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *