निगडी दि.२८ (सिटीनामा वृत्तसेवा)
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदानमास निमित्त रविवार दि.८ मार्च २०२६ रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पिंपरी चिंचवड विभागाच्या वतीने बलिदानमास रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यमुनानगर निगडी येथील अपंग विद्यालयात रविवार दि.८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बलिदानमास रक्तदानयज्ञ आयोजित केला असून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान शिबिरात रक्तदान करून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याचे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पिंपरी चिंचवड विभागातर्फे करण्यात आले आहे. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या पर्यंत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदानमास पाळल्या जात असून शहरातील ठिकठिकाणी श्री संभाजी सूर्यहृदय श्लोक, प्रेरणामंत्र, ध्येय मंत्र पठण करून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची नित्यपूजा करण्यात येत आहे.
