पुणे दि.६ सप्टेंबर (सिटीनामा वृत्तसेवा)
पुणे महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी सौ. वृषाली विजय शेखदार यांच्या नावाचा गांभीर्याने आणि सकारात्मक विचार करण्यात यावा, अशी मागणी समस्त ब्राह्मण संघ, पुणे महाराष्ट्र यांच्या वतीने पत्राद्वारे करण्यात आली आहे.
यासंदर्भात भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना समस्त ब्राह्मण संघाच्या वतीने स्वतंत्र पत्रे देऊन ही मागणी करण्यात आली आहे.
सौ. वृषाली विजय शेखदार या गेल्या वीस वर्षांपासून भारतीय जनता पार्टीशी निष्ठेने जोडलेल्या असून पक्षाचे कार्य सातत्याने करीत आहेत. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांनी दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केले आहे. विशेषतः ब्राह्मण समाजाच्या हितासाठी आणि समाजाभिमुख उपक्रमांसाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असून सिंहगड परिसरासह समाजातील विविध घटकांना त्यांच्या कार्याची माहिती आहे.
दीर्घकाळ पक्षाशी निष्ठेने जोडून राहून तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य संधी देणे ही भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे. पक्षाच्या या भूमिकेचा विचार करता, सौ. वृषालीताई शेखदार यांच्या वीस वर्षांच्या पक्षनिष्ठेची, सामाजिक कार्याची, जनसंपर्काची आणि समाजासाठी केलेल्या योगदानाची योग्य ती दखल घेऊन त्यांना पुणे महानगरपालिकेत कार्य करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा समस्त ब्राह्मण संघाने व्यक्त केली आहे.
सौ. वृषालीताईंना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळाल्यास त्यांच्या दीर्घ सामाजिक अनुभवाचा आणि जनसंपर्काचा उपयोग पुणे शहरातील नागरिकांच्या प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी करण्यासाठी तसेच समाजहिताच्या विविध विषयांवर सकारात्मक कार्य करण्यासाठी होऊ शकतो, असा विश्वास संघाने व्यक्त केला आहे.
“भारतीय जनता पार्टी आपल्या निष्ठावान आणि कर्तृत्ववान कार्यकर्त्यांच्या कार्याची योग्य वेळी दखल घेण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे गेली वीस वर्षे पक्षाशी प्रामाणिकपणे जोडून राहून सामाजिक व पक्षीय कार्य करणाऱ्या सौ. वृषाली विजय शेखदार यांचाही योग्य विचार करून त्यांना कार्य करण्याची एक संधी द्यावी,” अशी विनंती समस्त ब्राह्मण संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
वरील सर्व बाबींचा सारासार आणि सकारात्मक विचार करून सौ. वृषाली विजय शेखदार यांच्या नावाचा पुणे महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी योग्य तो विचार करण्यात यावा, अशी मागणी समस्त ब्राह्मण संघाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
