पंढरपूर दि.२५ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)
आषाढी एकादशी निमित्याने राज्यासह देशभर उत्साह आहे. भूवैकुंठ असणाऱ्या श्री क्षेत्र पंढरपुरात विठोबाचे दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी आपापल्या दिंड्यांसह दाखल झाले आहेत. आज एकादशी निमित्याने तब्बल २०-२५ किलोमीटरच्या दर्शनरांगा असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने अतिशय चोख व्यवस्था ठेवल्याने वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठोबाचे दर्शन घेणे सुकर झाले आहे.
मुख्यमंत्री पंढरपुरात दाखल; शासकीय महापूजा संपन्न
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक पंढरपुरात दाखल झाले होते. शनिवार दि.२५ जुलै रोजी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सौ.अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. या वर्षी मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान धाराशिवच्या कळंब तालुक्यातील गौरगावचे रहिवासी असणारे वारकरी माने दाम्पत्याला मिळाला असून त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत भगवान विठ्ठलाची शासकीय महापूजा केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
पंढरपूर हे ऊर्जास्थान आहे. राज्यभरात सर्वत्र चांगला पाऊस होवो, शेतकरी सुखी समृद्ध व्हावा, असे साकडे विठुरायाकंडे
घातले. तरुणाईला दिशा देण्यासाठी पंतप्रधान मोदी जो नवीन अध्याय लिहिताय, त्यासाठी त्यांना आशीर्वाद द्यावा अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना दिली.
