पुणे दि.३० एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा)
पुणे जिल्यातील वडार, वैदू , वाल्मिकी, कुचिकोरवी, डोंबरी, टाकारी, सिकलीकर, कैकाडी या सगळ्या वराह पालन करणाऱ्या समाजातील सर्व जाती प्रमुखांनी आणि प्रतिनिधिंनीं समाजातील पारंपारिक व्यवसायातून आर्थिक उन्नती व्हावी या हेतूने काही मागण्यांचे शासनाकडे पुणे जिल्हाधिकारी महोदयांमार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनाचे मुख्य मुद्दे :
देशी वराहांना अधिकृत पाळीव प्राण्याचा दर्जा मिळावा.
स्वतंत्र वराह पालन धोरण लागू करन्यात यावे.
या व्यवसायाला शासकीय योजना विमा आणि अनुदानाचे कवच मिळावे.
वराहाला उपद्रवी नव्हे तर उपजिवेकेचा आधार म्हणून मान्यता द्यावी.
या प्रमुख मागण्या सोबत इतरही महत्वाच्या मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.
निवेदन देतेवेळी भटके विमुक्त विकास परिषद चे पुणे महानगर संयोजक अरविंद देवकर, किशोर शिंदे अंशकालीन कार्यकर्ते तसेच कल्याणी भगत, सौ घोगरे ताई हिंदू जागरण मंच, व कैकाडी समाज,वाल्मिकी समाज, शिकलकर समाज,कुची कोरवी,वडार समाज, यांचे प्रमुख उपस्थित होते. याच मागण्यांचे निवेदन राज्यातील इतर ठिकाणीही देणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
