-साहित्य परिषद निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
पुणे – पिंपरी दि.१० फेब्रुवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
साम , दाम , दंड , भेद , अपप्रचार , गुन्हेगारी , दडपशाही , गैरव्यवहार , बेकायदेशीर कारवाया करून महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यकारिणी सत्ता टिकवण्याचे उद्योग विद्यमान कार्यकारिणी सदस्य विनोद कुलकर्णी व मिलिंद जोशी व अन्य सदस्य करत आहेत याचा आम्ही तीव्र निषेध करतो असा घणाघात महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समिती, पिंपरी चिंचवड , पुण्याचे कार्याध्यक्ष धनंजय कुलकर्णी व निमंत्रक शशांक महाजन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
विद्यमान कार्यकारिणी सदस्य साहित्य संमेलन व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांना धमकी देतात , साहित्य परिषद करीत हस्तक्षेप करू नका असा आदेश वजा धमकी देतात .
विनोद कुलकर्णी व त्यांचे प्रतिनिधी निवडणुकीतील विरोधी उमेदवारांवर दबाव आणून उमेदवारी अर्ज भरू नका असे प्रयत्न करून निवडणूक बिनविरोध करून येथील आपली बेकायदेशीर सत्ता कायम राहील असा प्रयत्न करत असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषद कृती समितीने सांगितले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची इमारत आपल्या निवडणूक पॅनेलचे , निवडणूक कार्यालय असल्या सारखे त्याचा उपयोग करत आहेत .
साहित्य परिषदेचा ताबा निवडणूक न घेता गेली पाच वर्ष ठेवला आहे .
न्यायालयात महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यकारिणी विरोधातील याचिकांचे निकालाच लागू नयेत यासाठी सर्व न्यायालयीन हातखंडे वापरणे व आपली बेकायदेशीर सत्ता कायम राहील याचा प्रयत्न करणे . १०० वे अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रमुख जबाबदारी देऊ , मानसन्मान देऊ अशी लालुच दाखवणे विरोधी उमेदवारांना दाखवणे तसेच साहित्य परिषदेचा पुरस्काराचे आमिष साहित्यिकांना दाखवून एक दबावाचे राजकारण करणे .
अनाधिकाराने संस्थेची घटना दुरुस्ती करणे सामान्य मराठी साहित्य प्रेमी संस्थेचे सभासद होता येणार नाही या साठी सभासद शुल्क वाढ करणे .
गेली पाच वर्षे सामान्य मराठी साहित्य प्रेमींची सभासद नोंदणी बंद , पण आपल्या परिचयातील , नात्यातील काही लोकांना सदस्य करून घेणे . परंतु विद्यमान अनधिकृत कार्यकारिणी सदस्यांच्या बेकायदेशीर कृत्यां विरोधात आवाज उठवणाऱ्या आजीव सभासदांचे सदस्यत्व रद्द करणे परिणामी विरोधी आवाज दडपून टाकणे हेच विद्यमान कार्यकारी मंडळाचे आहे .
धर्मादाय आयुक्त कार्यालय मान्यता नसलेल्या घटना दुरुस्ती आधारे संस्थेच्या निवडणुका घोषित करणे .
निवडणुकी साठी उपयोगात आणलेल्या मतदार याद्या जाणीवपूर्वक सदोष ठेवणे . दुबार मतदार , मृत मतदार ,पत्ते बदललेले मतदार आहेत अशी संख्या एकूण मतदारांच्या ३०% आहे .
आता विरोधी आघाडी उमेदवारांचा खाजगी बैठकीचे चित्रण सार्वजनिक करणे , हेत्वा आरोप करणे हा विद्यमान कार्यकारिणीच्या निवडणूक राजकारणाचा भाग आहे .
विद्यमान कार्यकारिणीची भूमिका , ना मुख्यमंत्री , ना सामान्य मराठी प्रेमी जनता , ना न्यायालय , ना विरोधी उमेदवार , ना सामान्य नागरीक , ना सामान्य आजीव सभासद महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यात सहभागी होऊ नये .
राजकरणी लोकांनी साहित्य परिषदेत हस्तक्षेप करू नय अशी भूमिका घ्यायची पण आपल्या निवडणूक प्रचार साहित्यात महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळ सदस्यांचे फोटो टाकणे . त्या आधारे मतदारांची दिशाभूल करणे हा या विद्यमान कार्यकारिणीचा एक दांभीक प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.परिवर्तन पॅनेलच्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासन पूर्ण करण्यासाठी या अनधिकृत कार्यकारिणीने गेली १० वर्षात काही का केले
नाही ? असा थेट सवालही यावेळी विचारण्यात आला.
कृती समितीच्या पदाधिकारी यांना बदनामीची
कायदेशीर सूचना पाठवणे हा सुध्दा या कार्यकारिणीच्या दबाव तंत्राचा भाग असल्याचे सांगून
मूळ हे पदाधिकारी आपल्या पद संरक्षणासाठी करत आहेत .
परिणामी विद्यमान अनधिकृत कार्यकारिणी व परिवर्तन पॅनेल सर्व बेकायदेशीर पद्धती व दबाव तंत्र वापरून महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ७/१२ आपल्या नावावर करून घेत आहेत , याच्या विरुद्ध कृती समिती सर्व स्तरावर संघर्ष करेल तो गेली दोन वर्ष करीत असल्याचे महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद कृती समितीतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले.
