सिनेअभिनेते योगेश सोमण रविवारी किवळेत

Share this News

– विराट हिंदू संमेलनाचे आयोजन


किवळे दि.२१ (सिटीनामा वृत्तसेवा)
संपूर्ण हिंदू समाजाच्या एकात्मतेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील किवळे भागात रविवार दि.२२ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सकल हिंदू समाज किवळे ग्रामस्थांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
किवळे भागातील के – विले सोसायटी समोरील आठवडी बाजार भव्य मैदानावर या विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनांत आदर्शनगर, बापदेव नगर भागातील सकल हिंदू बांधव, महिला भगिनी, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. संमेलनात प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध सिनेअभिनेते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण उपस्थित राहणार असून पिंपरी चिंचवड संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचे कार्याध्यक्ष योगाचार्य ह.भ.प.डॉ.अजितजी जगताप, घोरावडेश्वर प्रासादिक दिंडीचे ह.भ.प.मुकुंद नाना राऊत महाराज, इस्कॉन धाम रावेतचे दिग्विजय कृष्ण ब्रह्मचारी या महानुभावांचे आशिर्वचन लाभणार आहेत त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.

या संमेलनात किवळे परिसरातील विविध आध्यात्मिक, सामाजिक संस्था, संघटना, गणेश मंडळे, नवरात्री उत्सव समिती, जेष्ठ नागरिक मंडळे, प्रतिष्ठाने सहभागी होत आहेत.

किवळे परिसरात संमेलनाच्या निमित्याने सकल हिंदूंचे भव्य एकत्रीकरण होत असून या संमेलनात मोठ्या संख्येने सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *