गणेशोत्सव: अत्तरदे परिवाराचा पंचपरिवर्तन विशेष देखावा

Share this News

काळेवाडी / पिंपरी चिंचवड (पुणे) दि.१८ सप्टेंबर (सिटीनामा वृत्तसेवा)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक निःस्वार्थ भावनेने समाजामध्ये कार्य करीत असतात. व्यक्तीनिर्माण केंद्रबिंदू मानून सज्जनशक्तीचे एकत्रीकरण व हिंदुत्व जागरण संघ शाखेतून केल्या जात असते. चांगला माणूस घडविणारी फॅक्टरी म्हणून संघ शाखा ओळखली जाते. १ तासाच्या शाखेतल्या वेळापत्रकातून बौद्धिक व शारीरिक विकास होत असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देशभरात विविध सेवाकार्यात निस्वार्थपणे सहभागी होत असतात;अनेक आपत्ती प्रसंगी धावून जातात. संघ कार्याविषयी अनेकांना कुतूहल असते ,अनेकांना संघ समजून घ्यावासा वाटतो तर कित्येक जण संघ कार्याचे प्रचंड कौतुक करत असतात.

सर्वांपर्यंत संघकार्य पोहोचवण्याच्या हेतूने
पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातील गणेश लिलाधर अत्तरदे यांनी त्यांच्या काका होम्स सोसाइटी काळेवाडी या निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्याने विशेष देखावा सादर केला आहे.

अत्तरदे परिवार दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात. यंदाच्या वर्षी संघ शताब्दी निमित्याने पंच परिवर्तन या थीमवर आधारित सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्व बोध आणि नागरी कर्तव्ये या महत्वपूर्ण सामाजिक विषयावर जागृतीपर विशेष भित्तिचित्रे, काळेवाडी परिसरातील स्वामी विवेकानंद तरुण व्यवसायी रात्रशाखा त्यातील स्वयंसेवक, मैदान, भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, संघ संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार, श्री गुरुजी यांच्या प्रतिमा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवाकार्य विषयी माहिती देणारी पुस्तिका या गोष्टींचा देखाव्यात समावेश आहे.

हा देखावा पाहण्यासाठी संघ स्वयंसेवकांसह, नागरिक देखील येत असून या देखाव्यांच्या निमित्याने संघ कार्य सर्वांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केल्याची भावना अत्तरदे परिवाराने व्यक्त केली.

या देखाव्यासाठी गणेश, कौस्तुभ आणि जान्हवी अत्तरदे यांच्यासह परिवाराने परिश्रम घेतले असून त्यांच्या या देखाव्यामुळे अनेकांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *