अयोध्येत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ कार्यक्रमाचे आयोजन

Share this News

पुणे दि.२६ जून (सिटीनामा वृत्तसेवा)
प.पू. सद्गुरू हरिभाऊ जोशी निटूरकर महाराज यांच्या श्रीमुखातून श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन दि. १ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे करण्यात येणार असल्याची माहिती कथा आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.

सप्तदिवसीय या ज्ञानयज्ञात श्रीमद्भागवत महापुराणातील विविध प्रसंग, भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीला, भक्ती, ज्ञान व वैराग्य यांचे रसाळ निरूपण होणार आहे. कथा श्रवणातून भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन व भगवद्भक्तीचा लाभ मिळणार आहे.

देशभरातील भाविकांनी या पवित्र ज्ञानयज्ञास उपस्थित राहून कथारूपी अमृताचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. श्रीमद् भागवत कथेचे संपूर्ण ७ दिवसाच्या सर्व व्यवस्थेसह एकंदर सेवा शुल्क १८५००/- असणार आहे .
नोंदणी शुल्क ७०००/- निर्धारित केलेले आहे. जुलै २०२६ च्या २० तारखे पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन डॉ.विवेक पत्की यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ७०२०२३९५४४ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

कार्यक्रम : श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ
प्रवचनकार : प.पू. सद्गुरू श्री हरिभाऊ जोशी निटूरकर महाराज, हैद्राबाद.
कालावधी : दि. १ ते ७ ऑक्टोबर २०२६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *