वंचित समाज बांधवांना दाखले वितरण व सन्मान समारंभ उत्साहात

Share this News

पिंपरी दि.११ एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा)

भटके विमुक्त समाजातील समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता नाथपंथी डवरी सामाजिक संस्था व भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र यांच्यातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील नाथपंथी डवरी सामाजिक संस्था व भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश पि.चि.जिल्हा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शासकीय कागदपत्र शिबीरातर्गत भटके विमुक्त जाती जमातीतील समाज बंधू भगिनी तसेच मुला मुलींना जातीचे दाखले वितरण व सन्मान कार्यक्रम नुकताच सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी चौक, पिंपरी, पुणे येथे उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रविभाऊ लांडगे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. संजय पुरी, कार्याध्यक्ष – भ.वि. वि. परिषद महाराष्ट्र प्रदेश होते त्यांनी भटके विमुक्ताच्या सर्व समाज घटकाला विविध योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रेयत्न करावेत. सर्व समाजाचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. पिपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये भटके विमुक्त समाजासाठी कोणतीही गरज पडल्यास मनपा आपल्या बरोबर आहे असल्याचे सांगितले. समरसता गतिविधी पश्चिम महाराष्ट्र प्रांत
विलासजी लाडगे यांनी हिंदू संमेलनात भटके विमुतांचा सहभाग असणे आवश्यक असल्याचे सांगून आपण सकल हिंदू एक असणे काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले.. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांनी आपल्या मनोगतात संघाचे पंच परिवर्तनाची माहिती दिली यावेळी भाजपाचे रघुवीर शेलार, अनुलोमचे शिरीष भालेकर, बारा बलुतेदार संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष भाई विशाल जाधव. ओबीसी समितीचे शहराध्यक्ष
आनंदा कुदळे, सामाजिक कार्यकर्ते ऍड. हर्षद नढे पाटील किशोर शिंदे, राजाभाऊ कुदळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उपस्थित नाथपंथी डवरी, वडार, रामोशी, बंजारा, सिक्कलगर व कंजारभाट या समाजातील तब्बल १७३ लाभार्थ्यांना जातींचे दाखले या कार्यक्रमात वितरित करण्यात आले. आतापावेतो भटके विमुक्त समाजाचे ११०० पेक्षा अधिक दाखले संस्थेकडून लाभार्त्यांना वाटप करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमात सर्व मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी राजू निकम, बाबू कोळी, अरुण कोष्टी, संजय कदम, भैरवनाथ नार्वे, रामेश्वर साळुंखे, किरण जाधव, सोमनाथ निकम, रोहित राजपूत, लखन भोसले, दीपाली कोष्टी, तसेच अनुलोम पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ विधासभेचे पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच भटके विमुक्त विकास परिषद. पिंपरी चिंचवड महिला कार्यकर्ते प्रिया माने, दीपाली कोष्टी, लता डवरी यांचेसह काही न्याती समूहाचे पदाधिकारी व समाजाचे प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.बाबू कोळी यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन काका शितोळे यांनी केले.

समरसता गतिविधीचे पदाधिकारी, प्रमुख संयोजक ललित कासार व सहसंयोजक अरुण कोष्टी, ऍड. मुकुंद यदमळ राजु निकम, कृष्णा डवरी, रोहित राजपूत, बाबू कोळी यांनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *