मुंबई दि.३ फेब्रुवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या छत्रपती शिवरायांवरील अष्टक चित्रपटांमधील एक पुष्प असलेल्या ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. हा चित्रपट ३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता मात्र तो या दिवशी प्रदर्शित झाला नाही आता हा चित्रपट येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे असून यामध्ये मृणाल कुलकर्णी, योगेश सोमण, अजय पुरकर, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, विराजस कुलकर्णी, अक्षय वाघमारे, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सर, ऋषी सक्सेना यांसारखी मातब्बर कलाकार मंडळी झळकणार आहेत.
