भारतीय नृत्यकलेचा अनोखा अविष्कार

Share this News

-निलांबरी नृत्यअकादमी प्रस्तुत कार्यक्रमात रसिक -प्रेक्षक मंत्रमुग्ध

चिंचवड दि.३० जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
निलांबरी कला अकादमी प्रस्तुत भव्य कार्यक्रमात अनोख्या भारतीय नृत्यकलेच्या सादरकरणाने बालाजी विद्यापीठामधील भव्य प्रेक्षागृहातील रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले, निमित्य होते निलांबरी नृत्य अकादमीच्या वार्षिकोत्सवाचे.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती उमेश चांदगुडे, बालाजी विद्यापीठाचे डॉ. बीजू पिल्लई, प्रसिद्ध उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते उन्नीकृष्णन, मल्याळी समाजाचे महेश, निलांबरी अकादमीच्या सुजा दिनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन व नटराज पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.भारतीय संगीत, भारतीय नृत्यकला संपूर्ण जगाला भुरळ पाडणारे आहेत. शेकडो हजारो वर्षांपासून भारतीय कला, संगीत, नृत्यकला,ज्ञान, विज्ञान जगविख्यात आहेत. याच परंपरेतील भारतीय नृत्य प्रकारातील अनेक प्रकार पिंपरी चिंचवड मधील निलांबरीच्या तब्बल ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी उपस्थित कलाकारांनी संगीत सादरीकरण करून त्यावर नृत्य सादर करण्यात आले हे विशेष. एकापेक्षा एक सरस सादरीकरणामुळे सभागृह मंत्रमुग्ध झाले. सादरीकरण करणाऱ्यांमध्ये छोट्या मुलींपासून महिलांपर्यंत समावेश होता. उपस्थित रसिक प्रेक्षकांनी सादरीकरणाला दाद देऊन कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *