- राज्यपाल महोदयांची उपस्थिती
पुणे दि.७ जून (सिटीनामा वृत्तसेवा)
हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या (एचईएफ) पुणे जिल्हा चॅप्टरतर्फे आयोजित ‘शक्ती समिट-२०२६’ कार्यक्रम पुणे इंटरनॅशनल सेंटर पाषाण येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग (निवृत्त), क्विंटसेन्स फ्रॅग्रान्सेस प्रा. लि.चे अध्यक्ष भरत कामटे, ॲक्युरेट ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किरण जाधव, एचईएफचे अध्यक्ष तथा ‘पार्टेक्स एआय’चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी गौरव त्रिपाठी, फोरमचे सदस्य, उद्योजक उमेश चांदगुडे, उद्योजक मनोज पोचट, उद्योजिका श्वेता शालिनी यांच्या समवेत अनेक नवउद्योजक, उद्योजक, गुंतवणूकदार, व्यावसायिक आदी उपस्थित होते.

जागतिक नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची क्षमता केवळ भारताकडे आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थिती भारताला केवळ आत्मनिर्भर बनून चालणार नाही तर आर्थिक व संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी व्हावे लागेल त्यासाठी आपल्या सर्वांना सज्ज होण्याची गरज असल्याचा सूर मान्यवरांनी या महत्वपूर्ण कार्यक्रमात व्यक्त केला. कार्यक्रमाला उद्योजकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
