श्री सत्यसाई प्रेम प्रवाहिनी रथ यात्रा: पिंपरी चिंचवडमध्ये दाखल; भव्य स्वागत

Share this News

-भाविकांचा उत्साह;श्री सत्यसाई समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे दि.९ जून (सिटीनामा वृत्तसेवा)
भगवान श्री सत्यसाई बाबांच्या प्रेम प्रवाहिनी रथ यात्रेचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले असून ९ जुन ला सकाळी १०.३० च्या दरम्यान एस एन बी पी शाळेत भव्य स्वागत करण्यात आले .
भगवान श्री सत्यसाई बाबांचा श्री सत्य साई प्रेम प्रवाहिनी रथयात्रा आंध्र प्रदेश मधील पुट्टपर्ती येथून निघाली आहे . या सुंदर आणि भव्य अशा रथात स्वामींच्या मनोहारी पादुका आहेत. प्रेमप्रवाहिनी रथ यात्रा दि.९ जून ते ११ जून असे तीन दिवस पिंपरी चिंचवड शहरात असून विविध भागात जात आहे . दि.१२ जून रोजी रथ शहरातून पुढील यात्रेसाठी प्रस्थान करेल.
दि.१० व ११ जून रोजी शहरातील रावेत भागातील इस्कॉन मंदिर परिसरात रथ दर्शनासाठी असेल.शहरातील प्रत्येक भागात साईभक्त तसेच धार्मिक कुटुंबिय जोरदार स्वागत करीत आहे . रथयात्रेचे स्वागत एस एन बी पी शाळेत भव्य स्वागत करण्यात आले . त्याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमासोबत सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले . त्यानंतर ही रथयात्रा त्या भागात विविध ठिकाणी गेली . तेथे सुद्धा भव्य स्वागत करण्यात आले. सायंकाळी ६ ते ९ पिंपळे सौदागर मधील प्राचीन शिवमंदीर मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमासोबत संगीत रजनी कार्यक्रम, बालविकास विद्यार्थ्यांचा कार्यक्रम झाला . शेवटी मंगल आरती व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता श्री सत्यसाई सेवा समिती पदाधिकारी व साईभक्तांनी यशस्विते करीता परिश्रम घेत आहेत.या रथयात्रेमुळे भाविकांमध्ये प्रचंड उत्साह असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सत्य साई समिती पिंपरी चिंचवड शहरातर्फे करण्यात आले आहे.

संपर्क –
श्री.बाळासाहेब वाल्हेकर 9422013976
श्री.असीम निलोसे 9028013279
श्री.प्रशांत हरडे 9904560196
श्री.सुधीर कारंडे 8329016858
श्री.पियुप समक 9146024753
श्री.उमेश वाल्हेकर 9673709090
श्री.जितू बोरसे 8975891029

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *