नेरवा एज्युकेशन फाउंडेशन: मंगळवारी ज्ञानभारती परिसंवाद;मान्यवरांचा सहभाग

Share this News

पुणे दि.२० (सिटीनामा वृत्तसेवा)
नेरवा एज्युकेशन फाउंडेशनतर्फे भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित ज्ञानभारती परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवाद मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता भारतीय विचार साधना सभागृह, भावे शाळा परिसर येथे आयोजित करण्यात आला आहे. यात भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीमचे संस्थापक क्षितिज पाटकुले, डीआरडीओचे माजी समूह संचालक काशिनाथ देवधर, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीमधील स्कूल ऑफ वैदिक सायन्सेसच्या असोसिएट डीन प्रा. डॉ. माधवी गोडबोले, नेरवा एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. विंदी पुजारी, मराठवाडा मित्र मंडळातील प्रा. डॉ. सुजाता शेणई, फग्युर्सन महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. आनंद काटीकर यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या परिसंवादास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक डॉ. विंदा पुजारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *