डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी महास्वच्छता अभियान

Share this News

चिंचवड/ पुणे दि.२८ फेब्रुवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, अलिबाग यांच्या वतीने भारताचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. १ मार्च) सकाळी ८.०० वाजता पिंपरी चिंचवड शहरात महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.                    डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक सेवादायी समाजभिमुख उपक्रम राबवणारे प्रतिष्ठान आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ .०० वाजता आपल्या पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल यांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ‘पद्मश्री’ पुरस्कार सन्मानित डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. सदर महास्वच्छता अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील सिद्धिविनायक नगरी ते भक्ती शक्ती चौक म्हाळसाकांत चौक ते खंडोबा माळ चौक म्हाळसाकांत चौक ते सेंट उर्सुला शाळा पिंपरी स्मशानभूमी ते चाफेकर चौक -त्रिवेणी चौक ते भक्ती शक्ती , वाल्हेकर वाडी ते चाफेकर चौक
शाहूनगर परिसर -कृष्णानगर परिसर -डी मार्ट थेरगाव ते धनगर बाबा मंदिर काळेवाडी -धनगर बाबा मंदिर काळेवाडी ते काळेवाडी फाटा – काळेवाडी फाटा ते डांगे चौक तापकीर चौक थेरगाव ते बारणे कॉर्नर थेरगाव डांगे चौक थेरगाव ते मोरया गोसावी परिसर चिंचवड काळेवाडी डी मार्ट ते चाफेकर चौक चिंचवड या भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.या महास्वच्छता अभियानामध्ये डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो श्रीसदस्य स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहेत.पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ सर्वेक्षण करत असते. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या महास्वच्छता अभियानामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेला मोलाचा हातभार लागणार आहे.                                       

प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने फक्त महाराष्ट्र आणि देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान, विहरींची स्वच्छता, जल पुनर्भरण, धरण व तलावातील गाळ काढणे, मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे, कोरोना महामारीच्या काळात घेण्यात आलेले रक्तदान आणि प्लाज्मादान शिबीर त्याचबरोबर थॅलेसीमियासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठीही मोलाचे योगदान दिले जात असल्याचे प्रतिष्ठानतर्फे कळविण्यात आले आहे. या अभियानासाठी लागणारी साधनसामुग्री तसेच मोहिमेत सहभागी होणाऱ्या श्रीसदस्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क आणि हातमोजे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार असून या मोहिमेत सहभागी हजाराचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *