‘भरतमुनी रंगघन’ अनोख्या रंगमंचाचे गुढीपाडव्याला उद्घघाटन

Share this News

निगडी  दि.१८ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)
टाळ्यांचा कडकडाट, प्रकाशाचा झोत आणि कलेचा अविष्कार ! कलाकारांच्या स्वप्नांना साद घालण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात भरतमुनी रंगघन या अनोख्या रंगमंचाचा उद्घाटन सोहळा गुढीपाडव्याच्या दिवशी गुरुवार दि.१९ मार्च २०२६ सायंकाळी ५ वाजता कामयानी शाळा, निगडी प्राधिकरण या ठिकाणी होणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कलाकारांना कला सादरीकरणाच्या दृष्टीने, प्रायोगिक, व्यावसायिक नाट्य, नृत्य आविष्कार सादरीकरण, विविध कार्यक्रम यासाठी कलाकारांना, नागरिकांना अत्यंत माफक शुल्कात हे रंगमंच व सभागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या उद्घाटनाच्या निमित्ताने रंगविभोर प्रस्तुत “अमृतपुत्र” हा अतिशय उत्तम, रसिकांना खिळवून ठेवणारा नाट्य नृत्य अविष्कार सादर करण्यात येणार आहे. या मध्ये मंदार ढुमणे,अनिरुद्ध सराफ,वैभव केसकर,सागर चव्हाण,पियुष कुलकर्णी,वैभव वस्ते,स्वरेशा कुलकर्णी,स्नेहल कोकीळ कोमल देशमुख, माधव जोगळेकर,सायली काणे,पद्मिनी सोनावणे ,कलाश्री नृत्यशाळा नृत्यांगना तसेच डॉ. संजीवकुमार पाटील,संकेत लोंढे,ज्योती आपटे,वेदिका वाबळे,अमानत शेख हे सुप्रसिद्ध कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन शर्मिलाताई बाबर. उपमहापौर पिं.चिं.म.न.पा., भाऊसाहेब भोईर. विरोधी पक्ष नेते पिं.चिं.म.न.पा., शेखर चिंचवडे. नगरसेवक पिं.चिं.म.न.पा. यांचे हस्ते होणार असून यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कराज चिरपुटकर,स्नेहवनचे अशोक देशमाने,सिनेमा दिग्दर्शक मिलिंद लेले,निर्माते प्रद्योत पेंढारकर प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती रंगविभोर टीमने दिली असून जास्तीत जास्त रसिकांनी कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

‘भरतमुनी रंगघनची’ वैशिष्ट्ये

सदर फिरता रंगमंच हा प्रायोगिक नाटक, दीर्घांक , एकांकिका, नाट्य, नृत्य, गायन या साठी तसेच फिल्म स्क्रिनिंग, एकांकिका स्पर्धा, फिल्म फेस्टिव्हल इत्यादी कलाविष्कार सादर करण्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध झाला असल्याचे रंगविभोर टीम तर्फे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *