शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आढावा बैठक उत्साहात

Share this News

पिंपरी दि.३ ऑगस्ट (सिटीनामा वृत्तसेवा)
पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हा संघटन बांधणीसाठी शिवसेनेतर्फे विविध पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका सुरू असून या बैठकांना चांगला प्रतिसाद असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शिवसेना उपनेते तथा मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या आदेशानुसार जिल्हा समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हा संघटक संतोष सौंदरकर आणि महानगरप्रमुख राजेश फलके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची महत्त्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठक पिंपरी चिंचवड शहरात संपन्न झाली.

या बैठकीत शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या दृष्टीने सखोल चर्चा करण्यात आली. तसेच संघटन कौशल्य वृद्धिंगत करणे, चिंचवड विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत सकारात्मक विचारविनिमय, आगामी उपक्रमांचे नियोजन आणि विविध संघटनात्मक कामांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी सुदर्शन देसले, दिलीप कुसळकर, हरेश नखाते, बापू कातळे, नारायण लांडगे, महेश कलाल, संतोष बारणे, हेमचंद्र जावळे, संभाजी भेगडे, गोरख पाटील, अंकुश कोळेकर, मनीष श्रीवास्तव, कानिफनाथ तोडकर, श्रीकांत नवले, माधव मोराळे तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *