रा.स्व.संघातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांना अभिवादन

Share this News

निगडी दि.१ ऑगस्ट (सिटीनामा वृत्तसेवा)

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी चिंचवड जिल्हा आणि समरसता गतिविधि यांच्या वतीने भक्ती शक्ती चौक निगडी येथील स्मारकस्थानी विनम्र अभिवादन करण्यात आले. १ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता दरम्यान साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर निगडी येथील लोकमान्य टिळकांच्या स्मारकस्थानी पुतळ्याला हारार्पण करून दोन्ही महापुरुषांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल, जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, शैलेश कुलकर्णी, सोपान कुलकर्णी, सुधीर मारुलकर, महेंद्र बोरकर, नगर कार्यवाह अशोक वाळके पाटील यांचेसह अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *