पिंपरी (पुणे) दि.११ एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा)
थोर समाजसुधारक,स्त्री शिक्षणाचा आग्रह धरणारे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचे निर्मूलन, सामाजिक समरसतेचे कार्य सर्वांना प्रेरणादायी असून हा सामाजिक समरसतेचा विचार सर्वजण पुढे घेऊन जाऊया असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांनी केले.

शनिवार दि.११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन स्मारकस्थानी
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी चिंचवड जिल्हा आणि समरसता गतिविधि यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, सांगवी गट संघचालक लक्ष्मण पवार, मातंग साहित्य परिषदेचे डॉ.धनंजय भिसे, धनंजय खुडे, संत तुकाराम नगर कार्यवाह यांचेसह संघाचे पिंपरी, सांगवी परिसरातील स्वयंसेवक उपस्थित होते.
पुण्यातही संघ स्वयंसेवकांचे अभिवादन
सामाजिक समरसता गतीविधीच्या वतीने गंज पेठेतील ‘महात्मा फुले वाडा’ येथे मुख्य कार्यक्रम संपन्न झाला.
गंज पेठेत उपस्थित संघ स्वयंसेवक, मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन केले. यावेळी दलितमित्र पुरस्कारप्राप्त धोंडीराम कारंडे, महात्मा फुले नगराचे संघचालक मकरंद ढवळे, राज्य सरकारच्या ‘महात्मा फुले विचार साधन समिती’च्या सदस्या शामाताई घोणसे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख सुनील भंडगे, शरद शिंदे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील महात्मा फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ भाग संघचालक सुभाष कदम यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी महात्मा फुले लिखित ‘अखंडा’चे सामूहिक वाचन करण्यात आले,
अभिवादन प्रसंगी विद्यापीठ नगर तरुण व्यवसाय प्रमुख दिनकर पतंगे, सेवा प्रमुख संजय मोरे, एकत्व प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अमरजित सोनवणे, पुणे महानगर सद्भावना संयोजक संजय एडगे उपस्थित होते. तसेच प्रतीक गायकवाड, संजय गायकवाड, रोहित पाटील, ऋषिकेश जाधव, डॉ. अमोल तांबे आदींची उपस्थिती होती.
