पिंपरी दि.१५ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)
पिंपरी चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी संबंधित अधिकारी संजय कुलकर्णी आणि योगेश अल्हाट यांचे निलंबन करण्यात आले असले, तरी केवळ निलंबन ही कारवाई पुरेशी नसून या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना कायमचे बडतर्फ करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या ठाम मागणीसाठी आज १५ जुलै रोजी शिवसेना पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या आदेशानुसार नगरसेवक विश्वजीत बारणे , सुलभाताई उबाळे, निलेश तरस, निलेश बारणे ,ऐश्वर्याताई राजेंद्र तरस यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरप्रमुख राजेश किसनराव फलके आणि शहर प्रवक्ते चेतन बेंद्रे यांच्या नेतृत्वात महानगरपालिका प्रवेशद्वारावर कचरा उधळून निषेध आंदोलन करण्यात आले. या सर्व प्रकाराचा आका कोण? असा ही सवाल आंदोलकांनी विचारला.
दोषींना केवळ निलंबन नव्हे, तर कठोर शिक्षा मिळाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
याप्रसंगी सौ. सायलीताई साळवी, अश्विनीताई जाधव,बापूअण्णा कातळे, राजीव मेनन(संपर्कप्रमुख, युवासेना पिंपरी विधानसभा), कैलास आबा दुर्गे, निलेश हाके, अनिश काळभोर, प्रसाद दौंडकर, सौ. सुवर्णाताई तडसरे तसेच शिवसेना, युवासेना, युवतीसेना पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
