चिंचवड दि.१२ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)
मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी बारणे यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील क्रीडा क्षेत्रात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होणार असून, युवकांमध्ये पक्षाची ताकद वाढण्यास मोठी चालना मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करत शिवसेना ही जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारी संघटना असल्याचे सांगितले. समाजातील विविध क्षेत्रांतील सक्षम आणि कार्यक्षम व्यक्तींनी पक्षाशी जोडले जाणे ही संघटनेच्या बळकटीसाठी महत्त्वाची बाब असून, क्रीडा क्षेत्रातील युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या प्रश्नांसाठी आणि संघटन विस्तारासाठी सक्रियपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अमोल झेंडे, दत्ता गाडे, गणेश गायकवाड, राहुल चव्हाण, हरीश नवले, अविनाश मराठे, श्याम काळोखे, अतुल झेंडे, नरेंद्र पाटील, कुंदन चौधरी, मारुती विधाटे, कार्तिक कलापुरे, राहुल कोळपे, सुमित नाईक, मनोज जाधव, श्रीकांत अडसूळ, अमोल चतुर, सागर जाधव, उमाशंकर, अक्षय टाक आणि सुवर्णताई यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, क्रीडा क्षेत्रातील युवकांना संघटित करण्यासाठी आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राजू खांडभोर, महानगरप्रमुख राजेश किसनराव फलके, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचारणे, जिल्हा संघटिका शीलाताई भोंडवे, महिला संघटिका सरिताताई साने, देवगाव शहरप्रमुख सुनील हगवणे तसेच रामभाऊ सावंत, राजीव मेनन, सिद्धनाथ ठोकळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
या पक्षप्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला नवे बळ मिळणार असून, आगामी स्थानिक पातळीवरील जनसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांमध्ये नव्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग लाभणार असल्याचा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सिटीनामा न्यूजला दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात कळविले आहे.
