सी.एस.पी.सी : शहरात रविवारी १०० किमी सायकल रेस

Share this News

निगडी दि.४ एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा)
पिंपरी चिंचवड शहरातील सायकलपटूंनी एकत्र येत सायकल संघ पिंपरी चिंचवड या संघटनेची नुकतीच सुरुवात केली आहे. १ एप्रिल २०२६ रोजी निगडी प्राधिकरणातील सावरकर मंडळ येथील कॅप्टन कदम सभागृहात संघटनेचा लोगो, जर्सी अनावरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाला Indo Athletics society IAS संस्थापक अध्यक्ष गजानन खैरे, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, सायकलपटू उमेश कुटे प्रामुख्याने उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना खैरे यांनी सायकलपटूंना मार्गदर्शन करून शंका समाधान केले.
पेंडसे यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कुटे यांनी उपस्थितांना संबोधित करतांना सायकल संघाचा उद्देश, पार्श्वभूमी आणि उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली. स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवून पर्यावरणाचे भान राखत पुण्याची सायकलींचे शहर ही ओळख पुन्हा एकदा निर्माण करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक लीड ऑर्गनायझर रविंद्र होनराव यांनी तर आभार अतुल सुबंध यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील बहुसंख्य सायकलपटू सायकलप्रेमी उपस्थित होते.

काय आहे सी एस पी सी?

पिंपरी चिंचवड शहरातील सायकलिंग मध्ये आवड असणाऱ्या सायकलपटू स्वयंसेवकांनी एकत्र येत पर्यावरण व आरोग्य याविषयी समजात जागृती करणे हेतू विशेषत: तरुण पिढीसह सर्व वयोगटातील नागरिकांना सायकलिंग चे महत्व कळावे, आरोग्य चांगले राहावे व शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांना सोबत घेत १ एप्रिल २०२६ पासून सायकल संघ पिंपरी चिंचवड या संघटनेची सुरुवात केल्याचे सांगितले.

पहिलाच उपक्रम – १०० किमी सायकल रेस

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून शहरातील तब्बल १०० सायकलपटू १०० किमी सायकल रेस मध्ये सहभागी होणार आहेत. येत्या रविवारी ५ एप्रिल २०२६ रोजी श्री मोरया गोसावी मंदीर, चिंचवड ते श्री चिंतामणी मंदिर थेऊर अशी रेस आयोजित करण्यात आली आहे.यावेळी पहाटे ४.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. फ्लॅग ऑफ करिता पिंपरी चिंचवड शहराचे पोलिस अधीक्षक विनय चौबे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे असल्याचे संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे.

जास्तीत जास्त सायकलपटू, सायकलप्रेमी नागरिक तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *