एस.के.एस.फास्टनर्स रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद..!

Share this News

चाकण/ पुणे दि.५ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)
चाकण (पुणे) येथील एस. के. एस. मेंबर्स वेल्फेअर सोसायटी व भारत विकास परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने एस. के. एस. फास्टनर्स लिमिटेड (युनीट-3), चाकण (पुणे) येथे जनकल्याण रक्तपेढी, पुणे यांच्या सहकार्याने मंगळवार, दि. ३ मार्च २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
एस. के. एस. फास्टनर्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर सुशीलकुमार बिंदल यांच्या मातोश्री कै. कमला देवी बिंदल यांच्या पुण्यतिथीनिमित्त (स्मृतिप्रीत्यर्थ) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या सेवा कार्यात कंपनीतील वरिष्ठ पदाधिकारी, कामगार तसेच भारत विकास परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेचे सदस्य सहभागी झाले. तब्बल ८१ जणांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले दायित्व सिद्ध केले. भारत विकास परिषदेच्या सौ अनघा ताई पाटील व रविन्द्र शेंडे यांनीही रक्तदान केले.
गेल्या दोन वर्षांत आयोजित करण्यात आलेल्या पाच रक्तदान शिबिरांमध्ये एस. के. एस. फास्टनर्स लिमिटेडमधील ५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व कै. कमला देवी बिंदल यांना आदरांजली वाहून करण्यात आली. यावेळी एस. के. एस. फास्टनर्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर सुशीलकुमार बिंदल, डायरेक्टर सौ. मीनल बिंदल, विनोद जैन, राजीव अगरवाल, राहुल दुधाणी, तसेच हेड–क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम पवन गायकवाड उपस्थित होते.
तसेच भारत विकास परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेचे नॅशनल ऑडिटर जनरल किशोर गुजर, सेक्रेटरी (फायनान्स) सौ. अनघाताई पाटील व इतर सभासद उपस्थित होते.
या प्रसंगी जनकल्याण रक्तपेढी, पुणे यांनी एस. के. एस. फास्टनर्स लिमिटेड कंपनी सर्टिफिकेट व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.
भारत विकास परिषदेतर्फे एस. के. एस. फास्टनर्स लिमिटेडमधील वरिष्ठ पदाधिकारी, रक्तदाते, कर्मचारी व स्वयंसेवक तसेच जनकल्याण रक्तपेढीतील डॉक्टर व तंत्रज्ञ यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी पवन गायकवाड यांनी आभारप्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *