– मातृभूमी ढोलताशा पथकाचा १२ वा वर्धापन दिन
पिंपरी चिंचवड दि.१९ (सिटीनामा वृत्तसेवा)
‘ धर्मरक्षणाय कृतनिश्चय’ या उक्तीप्रमाणे मातृभूमीचा सांस्कृतिक वारसा संवर्धन, रणवाद्य वारसा जपण्याच्या उदात्त हेतूने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरणेतून कासारवाडी परिसरातील काही तरुणांनी एकत्र येत १२ वर्षापूर्वी एक छोटे ढोल ताशा पथक सुरू केले २०१४ मध्ये लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे बहारदार वृक्ष झाले आहे. सुरुवाती ला फक्त ३० ढोल ०९ ताशांचा प्रवास आज तब्बल १२५ ढोल , २५ ताशे व १५ भगवे ध्वज पर्यंत पोहचलाय.
सध्या या ढोल ताशा पथकात तब्बल २८० वादक सदस्य असून १२० तरुणींचा सहभाग आहे.
‘ मातृभूमी ‘ हे केवळ ढोल ताशा पथक नसून मातृभूमी पथक भारतीय संस्कृतीची गर्जना आहे , हे पथक नि:स्वार्थ सेवाकार्याची ऊर्जा आहे, हे पथक तरुणांच्या उत्साहाचे स्फूर्तीस्थान आहे.
निःस्वार्थ सेवाकार्य
कोरोना काळात सलग ५० दिवस अन्नछत्र, प्लाझ्मा साठी केलेले कार्य, कोकण तसेच कोल्हापूर पूरग्रस्त नागरिकांसाठी दिलेली मदत, गड किल्ले मोहिम आणि स्वच्छता मोहीम असो वा दुर्गामाता दौड, किल्ले प्रतिकृती बनवणे, पोलिस, भारतीय सैनिकांबरोबर रक्षाबंधन भाऊबीज, आदिवासी पाड्यांवर धान्य वाटप, वृद्धाश्रमात साजरी केलेली दिवाळी, दीपोत्सव, हिंदू नववर्ष शोभायात्रा या उपक्रमासह मातृभूमी पथक निःस्वार्थ भावनेने सेवाकार्यासाठी सदैव तयार असते.
मातृशक्तीचा लक्षणीय सहभाग
पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी परिसरातील महिलांना सांस्कृतिक व्यासपीठ करून देण्याच्या हेतूने पथकाची सुरुवात झाली या पथकात महिलांचा सहभाग अतिशय उस्फुर्त असतो यामुळे परिसरात स्त्री शक्ती जागरणाचे कार्य पथकाद्वारे कायम होत असते.
मातृभूमी ढोल ताशा पथकाचा माध्यमातून तरुण तरुणींना आपला दैदिप्यमान इतिहास, पुण्यपुरातन संस्कृती सोबत जोडून ठेऊन घराघरात जागर करण्याचे काम सुरू असून सामाजिक जाणिवेतून छत्रपती शिवरायांचे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे विचार पोहोचविण्याचे काम अखंड सुरू असल्याचे पथकातील सदस्य अभिमानाने व तितक्याच विनम्र भावनेने सांगतात.
ढोल ताशा पथके हे केवळ वादनाचे पथक नसून पथके जाज्वल्य भारतीय संस्कृतीचा उद्घोष असल्याचे पुन्हा एकदा मातृभूमी पथकाने सिद्ध केले आहे.
गणपती मध्ये दीड महिना पथकाचा सराव असतो व त्यानंतर खेळीमेळीच्या वातावरणात जोरदार वादन सुरू होते. वादनावेळी हिंदू संस्कृती, संत परंपरा, छत्रपती शिवरायांचे महनीय कार्य अशा वेगवेगळ्या पद्धतीने पथनाट्य सादरीकरण देखील केल्या जाते.वर्षभर विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जात असल्याचे पथकाचे अध्यक्ष अतुल दौंडकर यांनी सांगितले.
चेतन मेस्ता, विवेक कन्नलू, जयदीप साने, अजय शिंदे, अनिकेत कडदेकर, यशवंत गंभीरे, अमित दौंडकर, गजानन धावडे, दर्शन धावडे, शंतनु सालपेकर यांच्यासह शेकडो तरुण मातृभूमी पथकाद्वारे तरुणांना प्रेरणा देत आहेत.
र्तीस्थान आहे….आणि हे पथक म्हणजे राष्ट्रीय विचारांचा उद्घोष आहे.

निःस्वार्थ सेवाकार्य
कोरोना काळात सलग ५० दिवस अन्नछत्र, प्लाझ्मा साठी केलेले कार्य, कोकण तसेच कोल्हापूर पूरग्रस्त नागरिकांसाठी दिलेली मदत, गड किल्ले मोहिम आणि स्वच्छता मोहीम असो वा दुर्गामाता दौड, किल्ले प्रतिकृती बनवणे, पोलिस, भारतीय सैनिकांबरोबर रक्षाबंधन भाऊबीज, आदिवासी पाड्यांवर धान्य वाटप, वृद्धाश्रमात साजरी केलेली दिवाळी, दीपोत्सव, हिंदू नववर्ष शोभायात्रा या उपक्रमासह मातृभूमी पथक निःस्वार्थ भावनेने सेवाकार्यासाठी सदैव तयार असते.
मातृशक्तीचा लक्षणीय सहभाग
पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी परिसरातील महिलांना सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने पथकाची सुरुवात झाली या पथकात महिलांचा सहभाग अतिशय उस्फुर्त असतो यामुळे परिसरात स्त्री शक्ती जागरणाचे कार्य पथकाद्वारे कायम होत असते.
मातृभूमी ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून तरुण तरुणींना आपला दैदिप्यमान इतिहास, पुण्यपुरातन संस्कृती सोबत जोडून ठेऊन घराघरात जागर करण्याचे काम सुरू असून सामाजिक जाणिवेतून छत्रपती शिवरायांचे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे विचार पोहोचविण्याचे काम अखंड सुरू असल्याचे पथकातील सदस्य अभिमानाने व तितक्याच विनम्र भावनेने सांगतात.