श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान जयंती उत्सव व व्याख्यानमाला

Share this News

चिंचवड (सिटीनामा वृत्तसेवा)

श्री.स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे स्वामी विवेकानंद जयंती उत्सव व व्याख्यानमालेचे आयोजन शनिवार दि.१० जानेवारी २०२६ ते सोमवार दि.१२ जानेवारी २०२६ पर्यंत करण्यात आले आहे.
शनिवार दि.१० जानेवारी रोजी सायंकाळी ७ ते ९ दरम्यान पिंपरी चिंचवड शाखा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा.राजन लाखे यांचे जगण्यात मजा आहे या विषयावर व्याख्यान संपन्न झाले तर रविवार दि.११ रोजी युवराज पाटील यांचे चला कुटुंब जपूया या विषयावर तर सोमवार दि.१२ रोजी सायंकाळी ७ वाजता समाजप्रबोधनकार प्रा.जितेंद्र आसोले माणूस म्हणून जगतांना – आई बाप समजून घेतांना व्याख्यान होणार आहे.
याच दिवशी स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार डॉ.सागर उज्वला तानाजी काळे तर स्वामी विवेकानंतर भक्त पुंडलिक युवा पुरस्कार श्री.चंद्रकांत
गेणुभाऊ सहाणे यांना दिला जाणार आहे. यासोबतच मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर देखील होणार आहे. कार्यक्रम स्वामी विवेकानंद सभा मंडप वीर हनुमान मंदिर शरदनगर स्पाइन रोड, सेक्टर १८, प्राधिकरण चिंचवड पुणे या ठिकाणी होणार असून व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *