पिंपरी चिंचवड मध्ये प्रथमच ‘ भारत को जानो’

Share this News

  • २५ व्या अखिल भारतीय ‘ भारत को जानो’ स्पर्धेचे भव्य आयोजन
  • भारत विकास परिषदेचे भव्य आयोजन

पिंपरी चिंचवड दि.९ (सिटीनामा वृत्तसेवा)

विद्यार्थ्यांना भारतातला समृद्ध ऐतिहासिक वारसा, संस्कृती, परंपरा, इतिहास, भूगोल, स्वातंत्र्यलढा, शास्त्रज्ञ, नेते या सर्वांबद्दल माहिती व्हावी या हेतूने भारत विकास परिषद या देशव्यापी संघटनेतर्फे पिंपरी चिंचवड शहरात भारत को जानो या २५ व्या अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेचे भव्य आयोजन रविवार दि.११ जानेवारी रोजी टेल्को रस्ता, गणेश नगर, भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलेन्स सेंटर मध्ये केले आहे.
या स्पर्धेचे मुख्य अतिथी पद्मभूषण डॉ.विजय भटकर, मार्गदर्शक भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुरेश जैन, डॉ.नवीन कुमार संचालक भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद तर अध्यक्षस्थानी भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री दुर्गा दत्त शर्मा यांचेसह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सदर स्पर्धा संपूर्ण देशभरातील विविध भागातील शाळांमधून घेतलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विजयी झालेल्या प्रांत, क्षेत्र स्तरावरून कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन वयोगटातील प्रत्येकी १० टीम (दोन विद्यार्थ्यांची एक टीम) या चुरशीच्या स्पर्धेत भाग घेणार आहेत त्यातून राष्ट्रीय विजेता निवडला जाईल. यामध्ये संपूर्ण भारतातील स्पर्धेक सहभागी होत असल्याने स्पर्धेला विशेष महत्व आहे. भारत को जानो ही भारतवर्षाच्या विविध विषयांवर (इतिहास, भूगोल, राजकारण, रामायण, महाभारत इ.) ४८ विषयांवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आहे. भारत विकास परिषद ही समाजातील प्रबुद्ध, देशभक्त व्यक्तींची अराजकीय सामाजिक – सांस्कृतिक जागरण तसेच वंचित, असमर्थ घटकांसाठी सेवा कार्य करणारी राष्ट्रीय स्तरावरील अग्रेसर संस्था आहे. नवीन पिढीला सुसंस्कारित करून आवश्यक असणारे आपल्या देशाविषयी ज्ञान या स्पर्धेमुळे मिळावे यासाठी भारत को जानो ही स्पर्धा संपूर्ण भारतभरात दरवर्षी आयोजित करण्यात येते. यावर्षी होत असलेल्या २५ व्या स्पर्धेचे यजमानपद हे पश्चिम क्षेत्र पिंपरी चिंचवड पुण्याकडे असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी पिंपरी चिंचवड व पुणेकरांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन भारत विकास परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *