चिंचवड दि.१ (सिटीनामा वृत्तसेवा)
संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती तर्फे भरतमुनी स्मरण दिनानिमित्य पिंपरी चिंचवड शहरातील कै. दत्तोपंत म्हसकर सभागृह, निगडी येथे कलाकारांतर्फे विविध कलांचे सादरीकरण करण्यात आले त्यानंतर बक्षिस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाला संस्कार भारती पश्चिम प्रांत अध्यक्ष हेमंतजी मावळे, पश्चिम प्रांत महामंत्री प्रशांतजी कुलकर्णी, पश्चिम प्रांत कलाधरोहर संयोजिका सौ. रश्मी देव, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई चिखले उपस्थित होते. कलाकार व प्रेक्षक यांच्याशी संवाद साधताना शाहिर हेमंतजी मावळे यांनी कलाकारांना प्रोत्साहन दिले व खास शाहिरी बाण्याने शिवछत्रपतींविषयी गौरवोद्गार काढले.
सौ.रश्मी देव यांनी आपल्या भाषणात सादरीकरण केल्या गेलेल्या नाट्य छटांचे भरतमुनींच्या अष्टरस सिद्धांतानुसार वर्गीकरण करून उत्तम मार्गदर्शन केले, तसेच भरतमुनींनी लिहलेल्या नाट्यशास्त्र या संबंधी महत्त्वाचे काही मुद्दे प्रस्तुत केले. अत्यंत खुमासदार शैलीत माहितीपूर्ण विवेचन सांगत त्यांनी कलाकारांचा गौरव केला.
या प्रसंगी – संस्कार भारती तर्फे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या – चित्रकला, नृत्य व पोवाडा गायन स्पर्धेचे पुढील प्रमाणे बक्षीस वितरण करण्यात आले.
संस्कार भारतीचे ध्येयगीत सौ.शर्मिला शिंदे यांनी, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव सौ.आसावरी बर्वे यांनी केले, भूअलंकरण प्रमुख सौ. अनिता रोकडे आणि साहित्य विधा प्रमुख सौ. सुनीता कुलकर्णी यांनी स्वागतासाठी सुंदर रांगोळी काढली होती.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड संस्कार भारती सचिव सौ. लीना आढाव, उपाध्यक्ष नरेंद्र आमले, प्रफुल भिष्णूरकर, मंचिय कला संयोजक भावना सामंत, सहसचिव आसावरी बर्वे यांनी केले. संस्कार भारती कला धरोहर – केंद्रिय संयोजिका व प्रांतीय संयोजिका सौ. विनिता देशपांडे, संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती चे नृत्य विधा प्रमुख पद्मिनी सोनवणे, मासिक सभा प्रमुख सारंग चिंचणीकर, नाट्य विधा प्रमुख संजय चांदगुडे, रांगोळी विधा प्रमुख अनिता रोकडे, साहित्य विधा सह प्रमुख सुनीता कुलकर्णी यांनी खूप सुंदर रांगोळी काढली , दृश्यकला संयोजक धीरज दीक्षित, चित्रकला विधा प्रमुख रमेश खडबडे, बाल विधा प्रमुख सौ. रती देशमुख, संपर्क प्रमुख विजयकुमार कुलकर्णी, गणेश आढाव व लोककला विधा संयोजक सौ. वनिता मोहिते, कोश प्रमुख सौ. प्रचिती भिष्णूरकर आणि प्रचार प्रसिद्धी प्रमुख अनुष्का सामंत, समृध्दी कुलकर्णी यांच्यासह अनेक संस्कार मित्र कार्यक्रमास उपस्थित होते.
कै. दत्तोपंत म्हसकर मधील अरविंद वृंदा सभागृहात कला रसिकांनी व स्पर्धक मोठ्या संख्येत उपस्थित होते. संपूर्ण वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.
