निगडी दि.१८ सप्टेंबर (सिटीनामा वृत्तसेवा)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धर्मजागरण विभागाचे विभाग कार्यकर्ते, उद्योजक संतोष गायकवाड यांच्या विठ्ठल मंदिर परिसर निगडी येथील निवासस्थानी गौरी आगमन झाले यावेळी परिवारातील मातृशक्ती ने विशेष परिश्रम घेऊन ग्रामविकास या थीम वर आधारित विशेष देखावा सादर केला.

गायकवाड परिवारातील गौरी आगमन सोहळ्यात अनेकजण सहभागी होतात. गौरींचे सुंदर प्रसन्न रूप बघून सर्वांना आनंद होतो. यावेळी विविध पक्वान्यांचा नैवेद्य दाखवला जातो.

यावर्षीच्या देखाव्यात आपल्या गावाकडील बैलगाडी, जुन्या पद्धतीचे स्वयंपाकघर, भांडी त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी व टाळ मृदुंगाच्या जयघोषात दंग झालेले वारकरी विशेष आकर्षण होते.

