‘अनुसंधान’च्या उद्घाटन सोहळ्यात कोकीळ यांची प्रकट मुलाखत

Share this News

निगडी दि.१ एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा)
ध्वनि प्रकाशाच्या माध्यमात ताटी उघडा ज्ञानेश्वरा सारख्या महानाट्यांची निर्मिती करणारी ‘अनुसंधान कला संस्था’ नव्या रूपात निगडी येथील ‘रुद्रंग’ या संस्थेच्या सहकार्याने रविवार, दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता भरतमुनी रंगघन सभागृह, कामायनी प्रशाला, चिंतामणी मंदिराशेजारी, निगडी प्राधिकरण येथे रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या अध्यक्षतेखाली आणि वाशी, नवी मुंबई येथील माजी नगरसेवक रमेश शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार असून याप्रसंगी आमदार अमित गोरखे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका शैलजा मोरे, नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, चित्रपट निर्माते गणेश शिंदे आणि रुद्रंगचे अध्यक्ष रमेश वाकनीस यांची प्रमुख उपस्थिती राहील. उद्घाटन सत्रानंतर ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश कोकीळ यांच्याशी निवेदक श्रीकांत चौगुले आणि नाट्य – चित्रपट अभिनेते संदीप साकोरे हे प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून सुसंवाद साधतील. या कार्यक्रमास रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अनुसंधान व रुद्रंगचे सदस्य बाळासाहेब विभूते आणि माधुरी ओक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *