निगडी दि.२४ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)
येथील स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या पुढाकाराने महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मिशन स्वावलंबन लोकसंचालित साधन केंद्र, पुणे यांच्या सहकार्याने महिलांसाठी दि.२१ जुलै ते २४ जुलै २०२६ असे चार दिवसीय मोफत व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचा ६० महिलांनी प्रत्यक्ष लाभ घेतला.
या प्रशिक्षणात महिलांना आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, उद्योजकता विकास, व्यवसाय नियोजन, मार्केटिंग कौशल्य, गुंतवणूक तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. कार्यशाळेचा समारोप हा प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करुन करण्यात आला .या उपक्रमामुळे महिलांमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण होऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि उद्योजक बनण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य प्राप्त झाले.तसेच समारोपाच्या कार्यक्रमास स्व.दत्तोपंत म्हसकर सार्व.वि.संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार,भारतीताई तारे,मनीषा जोशी,प्रशिक्षक चंद्रजीत बनसोड,किरण कुलकर्णी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
