हिंदुभूषण स्मारक ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर;व्याख्याने

Share this News

मोशी दि.१८ (सिटीनामा वृत्तसेवा)
फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या पर्यंत धर्मवीर छत्रपती बलिदानमास पाळल्या जाणार असून हिंदुभूषण स्मारक ट्रस्टतर्फे रविवार दि.२२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण याठिकाणी करण्यात आले आहे.           बलिदान मासादरम्यान दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी पराशर मोने, १ मार्च रोजी सूरज पाटील, ८ मार्च रोजी दिगंबर पडवळ, १५ मार्च रोजी महेश वाळके यांची व्याख्याने होणार आहेत.                                   धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदानमास दुखवटा पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून यादरम्यान बुधवार दि.१८ फेब्रुवारी ते बुधवार १८ मार्च २०२६ पर्यंत दररोज सायंकाळी ६ ते ७ पर्यंत श्री संभाजी सूर्यहृदय श्लोक, प्रेरणामंत्र, ध्येय मंत्र पठण होणार असल्याची माहिती हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट पिंपरी चिंचवड,पुणे तर्फे ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांनी दिली आहे.                            

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *