मावळ लोकसभा शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक -कार्यकर्ता मेळावा उत्साहात

Share this News

थेरगाव (पिंपरी चिंचवड) / पुणे दि.३ एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा)
शिवसेना पिंपरी चिंचवड शहर व मावळ लोकसभेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक शुक्रवार दि.३ एप्रिल रोजी थेरगाव येथील मोरया पॅलेस येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा नवनियुक्त संपर्कप्रमुख ना. उदयजी सामंत आणि संसदरत्न खा.श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी शिवसेना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने ना. उदयजी सामंत आणि खा. श्रीरंगआप्पा बारणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. बैठकीत पक्ष संघटन आणि पक्ष बळकटीकरण या विषयांवर सविस्तर आढावा घेऊन आगामी रणनीतीवर चर्चा करण्यात आली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री ना.उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात आगामी काळातील संघटनात्मक बांधणी, पक्षवाढ, स्थानिक प्रश्नांवरील पाठपुरावा तसेच येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या बळावर उभी असलेली संघटना आहे. तळागाळातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि जनतेच्या विश्वासाच्या जोरावर संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी शिवसेना महिला उपनेत्या तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेविका श्रीमती सुलभाताई उबाळे, शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद, शिवसेना जिल्हाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, बाळासाहेब चांदेरे, भगवान पोखरकर, शिवसेना जिल्हा समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा प्रमुख शरदराव हुलावळे, दिलीपशेठ पांढरकर, शिवसेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख नगरसेवक निलेश तरस, शिवसेना मावळ तालुका प्रमुख राम सावंत, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष राजेंद्र तरस, नगरसेवक निलेश बारणे, युवासेना जिल्हा प्रमुख सागर पाचरणे, शिवसेना महिला तालुका प्रमुख शुभांगीताई काळंगे, युवती सेना सायली साळवी, शिवसेना महिला पिंपरी चिंचवड शहर प्रमुख श्वेताताई कापसे, रूपेश कदम, संतोष सौदनकर, सौ. सुनिताताई चंदणे यांचेसह शिवसेना नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *