नसरापूर अमानुष घटना:अभाविपद्वारे ‘मशाल मोर्चा’ काढून तीव्र निषेध

Share this News

आकुर्डी / पिंपरी चिंचवड दि.५ मे (सिटीनामा वृत्तसेवा)

नसरापूर येथे एका चिमुकलीवर झालेल्या अत्यंत दुर्दैवी आणि अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,आकुर्डी नगराच्या पिंपरी चिंचवडच्या वतीने गुरुद्वारा परिसरात घटनेच्या निषेधार्थ ‘मशाल मोर्चा’ काढण्यात आला. या निंदनीय घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत, आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, अशी आक्रमक मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.
हातामध्ये मशाल आणि निषेधाचे फलक घेऊन ‘नराधमांना फाशी झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी आकुर्डी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “नसरापूर येथील घटना ही मानवतेला काळिमा फासवणारी आहे. अशा अमानुष प्रवृत्तींमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमावर कठोरतम कारवाई करण्यात यावी, तरच पीडितेच्या कुटुंबाला खरा न्याय मिळेल.”
या मशाल मोर्चाप्रसंगी अभाविप पिंपरी चिंचवड महानगरमंत्री हिमांशू नागरे, सहमंत्री सोहेल शेख, प्रथमेश भवर यांच्यासह अनेक विद्यार्थी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(मशाल मोर्चाप्रसंगी उपस्थित अभाविप विद्यार्थी कार्यकर्ते)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *