नसरापूर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला त्वरित न्याय द्यावा – निखिल लातूरकर

Share this News

नांदेड दि. ५ मे (सिटीनामा वृत्तसेवा )
मानवजातीला काळीमा फासणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार अमरनाथ राजूरकर,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर,मनपा सभागृह नेता महेश कनकदंडॆ,भाजपा युवा नेते गजानन जोशी,प्रितीताई वडवळकर ,गंगाबिशन कांकर, अनंत राखे, भाग्यश्री कुलकर्णी, अनिल डोईफोडे, केदार नांदेडकर, पत्रकार किरण कुलकर्णी, सुनील जोशी, संतोष कुलकर्णी, अभय कुळकजाईकर, कृष्णा उमरीकर,शितल खांडिल, सतीशगुरु पोतदार, शैलेश नागापूरकर, गिरीष व्यवहारे, व्यंकटेश कुलकर्णी, शशिकांत देशमुख, सुधीर देशमुख, राजेश कुलकर्णी, दिलीपकुमार शर्मा, सोनु उपाध्याय, गोविंद शर्मा, रमेश मेगदे, मोहिनी दिवाकर, नागेश दत्तात्रय, डी. बी. पारखे, संजय कुलकर्णी, प्रविण कुलकर्णी, विनोद पांडे, गिरीष नाईक, प्रेमराज शर्मा, सुवर्णा भोरे,मानिनी नांदेडकर, प्रणिता कुलकर्णी, मंगला नाईक, नयना देशपांडे,धनश्रीताई कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नरसापुर प्रकरणाविषयी नांदेडमधील समाजबांधवांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

अ.भा. ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अशा प्रकारच्या गुन्ह्यांमुळे समाजातील नैतिकता आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अल्पावधीत अटक केली ही बाब स्वागतार्ह असली, तरी पीडितेला न्याय मिळण्यासाठी पुढील प्रक्रिया अधिक कठोर आणि जलद गतीने होणे अत्यंत आवश्यक आहे.

या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळण्यासाठी पुढील न्यायप्रक्रिया जलद आणि कठोर होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून लवकरात लवकर निकाल द्यावा, तसेच आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

अशा प्रकारचे गुन्हे समाजातील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, असे नमूद करत गुन्हेगाराला कोणतीही जात किंवा धर्म नसतो, तो केवळ गुन्हेगार असतो, असेही निवेदनात म्हटले आहे. समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात,अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *