पुणे दि.१० ऑगस्ट (सिटीनामा वृत्तसेवा)
देवस्थान इनाम प्रश्नांसंबंधी महत्त्वपूर्ण बैठक राज्यसभा विद्यमान खासदार, कोथरूडच्या माजी आमदार खा.डॉ.मेधा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पुण्यात संपन्न झाली.
देवस्थान इनाम संदर्भातील विविध प्रलंबित प्रश्न, संबंधित नागरिकांच्या अडचणी आणि त्यांच्या हक्कांशी निगडित विषयांवर राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या समवेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत विषयाची सद्यस्थिती, पुढील कार्यवाही आणि संबंधित प्रश्न शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक प्रयत्न याबाबत सकारात्मक संवाद झाला. देवस्थान इनाम कृती समितीच्या माध्यमातून हा विषय सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण बैठकीस ओमप्रकाश गिरी, राजेंद्र बन, विश्वजीत देशपांडे, महेश कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, ॲड. सचिन रेणुंरकर, ॲड. अण्णासाहेब शिंदे, रंगनाथ गुरव, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक शीतल शिंदे यांच्यासह देवस्थान इनाम कृती समितीचे पदाधिकारी व संबंधित कार्यकर्ते प्रमुख उपस्थित होते.
प्रश्न जनतेचा असेल, तर पाठपुरावा सातत्याचा आणि प्रयत्न ठाम असले पाहिजेत.
देवस्थान इनाम प्रश्नांच्या न्याय्य तोडग्यासाठी हीच आपली भूमिका असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
