…आता गॅस सिलेंडरचे वजन घटणार; मिळणार फक्त ८ किलो गॅस?

Share this News

मुंबई दि.२३ (सिटीनामा वृत्तसेवा)
सध्या सुरू असलेल्या अमेरिका
इराण, इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून, त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या वजनात कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहमी मिळत असलेल्या १४.२ किलोचा सिलिंडर यापुढे केवळ ८ ते १० किलो गॅससह उपलब्ध होणार आहे. सिलिंडरचा आकार तोच राहणार असून गॅसचे प्रमाण कमी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पेट्रोलियम कंपन्यांना गॅसचे प्रमाण कमी करण्याचे आदेश देण्यात सरकारतर्फे देण्यात आले आहेत. सध्याच्या पुरवठ्याच्या १४.२ किलोचा साठा संपल्यानंतर ही नवीन व्यवस्था लागू केल्या जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या या परिस्थितीला आंतरराष्ट्रीय राजकारण आणि युद्धाची स्थिती कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलने इराणमधील गॅस आणि तेल साठ्यांवर केलेले हल्ले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारमधील नैसर्गिक वायू प्रकल्पांना लक्ष्य केल्यामुळे पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

व्यावसायिक गॅस पुरवठ्यात वाढ
राज्यातील हॉटेल व्यावसायिक आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना होणाऱ्या गॅस पुरवठ्यात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. घरगुती सिलिंडरचे वजन कमी होणार असल्याच्या माहितीमुळे त्याच्या किमतीत नेमकी किती घट होणार, याबाबत मात्र अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.

किंमत नेमकी किती?
कमी वजनाच्या गॅसमुळे सिलिंडर लवकर संपणार असल्याने घरगुती बजेटवर ताण पडू शकतो त्यामुळे गृहिणी चिंतेत आहेत.

आता येणाऱ्या कमी वजनाच्या सिलिंडरचे दर नेमके किती ठरवले जातात, याकडे आता सर्व सामान्य नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *