स्वा.सावरकर जयंती: राष्ट्रीय सेवा संघातर्फे अभिवादन

Share this News

पुणे दि. २८ मे (सिटीनामा वृत्तसेवा)
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा संघाच्या वतीने डेक्कन परिसरातील सावरकर स्मारक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास माजी महापौर सौ. मंजुषा नागपुरे, नगरसेविका सौ. ज्योत्स्ना कुलकर्णी, नगरसेविका मिताली साळवेकर, माजी नगरसेविका सौ. माधुरी सहस्त्रबुध्ये, डॉ. सचिन बोधनी, प्राज भिलारे, सचिनजी टापरे, मंदार रेडे तसेच नाट्य परिषदेचे अध्यक्ष, प्रसिद्ध सावरकर व्याख्याते व मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते योगेश सोमण प्रमुख उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावरकर यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांचा व हिंदुत्वाच्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. “राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण” हे सावरकरांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

हा कार्यक्रम त्या ऐतिहासिक स्थळी आयोजित करण्यात आला होता, जिथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या समवेत विदेशी कपड्यांची होळी केली होती. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.

राष्ट्रीय सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सावरकरांच्या राष्ट्रभक्ती, त्याग आणि समाजजागृतीच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *