शिवसेनेच्या घोंगडी बैठका उत्साहात; नागरिकांचा प्रतिसाद

Share this News

सांगवी दि.७ सप्टेंबर (सिटीनामा वृत्तसेवा)

पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेतर्फे घोंगडी बैठका उत्साहात सुरू असून शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी घोंगडी बैठक टप्पा ०६ चे आयोजन प्रभाग क्र. ३२, जुनी सांगवी येथे करण्यात आले होते.

या बैठकीला शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेश किसनराव फलके, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सागर पाचर्णे तसेच चिंचवड विधानसभा प्रमुख बापू कातळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर बैठकीचे नियोजन प्रभाग क्रमांक ३२ मधील शिवसेना, युवासेना, सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचे शिवसेनेतर्फे कळविण्यात आले.

या घोंगडी बैठकीस शिवसेनेचे शाखाप्रमुख, विभागप्रमुख, प्रभागप्रमुख, उपप्रमुख, विधानसभा प्रमुख तसेच तळागाळातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

बैठकीदरम्यान संघटना विस्तार, पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणे, अधिकाधिक युवक व नागरिकांना शिवसेनेच्या संघटनेशी जोडणे आणि पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक ताकद देणे याबाबत पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. याबरोबरच स्थानिक नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्या योजनांचा प्रभावीपणे लाभ मिळवून देणे, जनसामान्यांपर्यंत शिवसेनेचे कार्य पोहोचवणे आणि संघटना अधिक सक्षम व मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन महानगरप्रमुख राजेश फलके यांनी केले.

तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत संघटना पोहोचवण्याच्या निर्धाराने बैठक उत्साहात संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *