शिवसेना: संघटनात्मक बांधणीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये घोंगडी बैठका

Share this News

पिंपरी दि.३ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)
शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड शहरात ‘घोंगडी बैठका’ या उपक्रमाचे आयोजन मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या आदेशाने करण्यात येत असल्याची माहिती शिवसेना महानगर प्रमुख राजेश फलके यांनी दिली आहे.
या बैठकींच्या माध्यमातून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक यांच्याशी थेट संवाद साधून स्थानिक प्रश्न जाणून घेणे, नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे तसेच बूथस्तरावरील संघटन अधिक सक्षम करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले आहे.

तसेच घोंगडी बैठकींमध्ये प्रभाग स्तरावर प्रत्यक्ष भेटी घेऊन जनतेच्या समस्या ऐकल्या जातील. शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, स्थानिक विकासासंदर्भातील सूचना जाणून घेणे आणि पक्षाच्या आगामी संघटनात्मक कार्यक्रमांची माहिती देणे, यालाही या बैठकींमध्ये प्राधान्य दिले जाईल असे फलके यांनी सांगितले.

*घराघरात शिवसेना… प्रत्येक शिवसैनिकापर्यंत संघटना **
हा संकल्प समोर ठेवून या घोंगडी बैठकींच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा आणि संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे.

या बैठकांची सुरुवात शनिवारी दि. ४ जुलै रोजी शाहूनगर आणि दापोडी येथून होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड शिवसेना महानगरप्रमुख राजेश फलके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *