प्रयत्न व अस्तित्व सोशल फाऊंडेशन: रक्तदान शिबिराचे आयोजन

Share this News

चिंचवड / पुणे दि.२५ जुलै (
येथील प्रयत्न सोशल फाउंडेशन आणि अस्तित्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून रविवार, दि.२६ जुलै २०२६ रोजी संत तुकाराम उद्यान, महापौर निवास मैदानाजवळ, प्राधिकरण, निगडी येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर वीर जवानांना विनम्र अभिवादन व कृतज्ञ श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे फाउंडेशनतर्फे कळविण्यात आले आहे.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एका रक्तदात्याच्या रक्तामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. सध्याच्या काळात रुग्णालयांमध्ये रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असून समाजातील प्रत्येक नागरिकाने या पवित्र कार्यात सहभागी होणे ही काळाची गरज असून नागरिक, युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार, नातेवाईक व सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
अजय मोरे – ८९८३८९१६४५
राजीव मेनन – ८७६७७०७८५२
जयेश मोरे – ७९७२५८८३११

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *