निवड: शिवसेना शिंदे गटाच्या महानगरप्रमुखपदी राजेश फलके

Share this News

पिंपरी-चिंचवड दि.२२ जून (सिटीनामा वृत्तसेवा)
शिवसेना (शिंदे गट) पिंपरी-चिंचवड शहराच्या महानगरप्रमुखपदी जयहिंद मित्र मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश किसनराव फलके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असलेल्या राजेश फलके यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड शहर महानगरप्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे.

त्यांच्या निवडीमुळे शहरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

राजेश फलके यांच्यावर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *