नगरसेविका सौ.ऐश्वर्या तरस यांनी घेतली नव्या आयुक्तांची सदिच्छा भेट

Share this News

पिंपरी/ पुणे दि.१७ (सिटीनामा वृत्तसेवा)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रभाग क्र.१६ मधील शिवसेनेच्या नगरसेविका सौ. ऐश्वर्याताई राजेंद्र तरस यांनी नव्या आयुक्तांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभाग क्र.१६ मधील विविध विकासकामे, नागरी सुविधा व प्रलंबित प्रश्न याबाबतही त्यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे नगरसेविका तरस यांनी सांगितले.  आगामी काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष लक्ष देऊन आवश्यक त्या कामासाठी महानगरपालिकेकडून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. प्रभागातील नागरिकांच्या सोईसुविधा वाढविणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे व विकासकामांना गती देणे यासाठी सकारात्मक सहकार्य मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रभाग क्र.१६ चे नगरसेवक व शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस, युवासेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, संकल्प सोशल फाऊंडेशनचे बापूसाहेब कातळे, नगरसेविका सौ.रेश्माताई बापूसाहेब कातळे प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या रूपाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला नवे पूर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *