तत्विका आणि अलिफ: विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणाच्या नव्या संधी

Share this News

पिंपरी दि.५ ऑगस्ट (सिटीनामा वृत्तसेवा)
पुणे आणि पिंपरी – चिंचवड परिसरातील मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात परदेशात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्विका ओव्हरसीज एज्युकेशन सर्व्हिसेस आणि परदेशातील उच्चशिक्षण क्षेत्रातील प्रवेशासाठी नावाजलेल्या अलिफ ओव्हरसीज हायर एज्युकेशन या संस्थेच्या क्षेत्रीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रीतम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीतम गंजेवार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अलिफ हायर एज्युकेशन ओव्हरसीजचे
संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम शेख होते; तर
विशेष अतिथी म्हणून डॉ. भालचंद्र चौधरी – डीन, सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेज अंधेरी, डॉ. संजय झोपे – प्राचार्य, सह्याद्री इंजिनिअरिंग कॉलेज, बी.एल. जोशी – स्किल्स अकादमी, डॉ. मनीषा भेंडे – डीन, अलार्ड युनिव्हर्सिटी, डॉ. साजिद अल्वी – संचालक, झील इन्स्टिट्यूट, डॉ. राजीव घोडे – डीन, स्कूल ऑफ आर्ट्स, इंदिरा युनिव्हर्सिटी, डॉ. धनंजय चौधरी – प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील आर्किटेक्चर कॉलेज, ओम शर्मा – संचालक, शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, डॉ. गणेश अंबिके – संस्थापक, मोरया पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, डॉ. ललित पाटील – वैद्यकीय शिक्षण सल्लागार, डॉ. पवन भोळे – शैक्षणिक सल्लागार आदी मान्यवर उपस्थित होते.

या उद्घाटन समारंभाला विविध क्षेत्रातील ३०० पेक्षा अधिक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना मान्यवरांनी दर्जेदार उच्च शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तरुणांनी केवळ भारतापुरतेच मर्यादित न राहता जगभरातील संधींचा शोध घेऊन करिअर घडवावे, असा सल्ला त्यांनी दिला. पिंपरी – चिंचवडमधील माहिती तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवर अमोल व तृप्ती धनपलवार, राजलक्ष्मी निवघेकर, अनिल व राखी झोपे आणि त्रिशूल बिज्जमवार यांच्या एकत्रित प्रयत्नातून तत्विका ओव्हरसीज एज्युकेशन सर्व्हिसेसची स्थापना झाली आहे.

तत्विका आणि अलिफ Aliff यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे आणि पिंपरी – चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या शुल्कात २२ देशांतील ७७० विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, कायदा आदी विविध क्षेत्रांतील प्रवेश, प्रवेशपूर्व परीक्षांचे मार्गदर्शन, शैक्षणिक कर्ज, निवास व्यवस्था आणि परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांशी जोडणी यासह संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. पिंपरी – चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शन केंद्राची मोठी गरज असल्याचे मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. तत्विका आणि अलिफ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी पाटील यांनी केले. तत्विका आणि अलिफचे सर्व सहकारी आणि समुपदेशक या वेळी उपस्थित होते.

गणेश आर्केड, कोकणे चौक, रहाटणी, पिंपरी – चिंचवड येथे संस्थेचे प्रशस्त आणि सुसज्ज कार्यालय सुरू झाले असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *