चिंचवड दि.१६ सप्टेंबर (सिटीनामा वृत्तसेवा)
देशाचा सर्वांगीण विकास साधावयाचा असेल तर ग्राम विकास म्हणजेच आपल्या देशातील खेड्यांचा विकास अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आपल्या गावाचे नाते जपणे व सुदृढ करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी सदस्य विनय कानडे यांनी व्यक्त केले. ते तानाजीनगर चिंचवड येथील ग्रामविकास सेवा केंद्र श्रीराम मंदिर चिंचवड येथे आयोजित ग्रामविकास परिचय कार्यक्रमात बोलत होते.
संस्थेचे उपाध्यक्ष सचिन बालवडे यांनी सर्वांचे स्वागत करून संस्थेचे अध्यक्ष माधवराव खोत यांनी सर्वांचा परिचय करून दिला .
भारतमाता पूजन व दीप प्रज्वलन माधवराव खोत विनयजी कानडे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी यांनी केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष खोत यांनी प्रास्ताविकात खेडयांचा सर्वागीण विकास करण्यासाठी हि संस्था १९८३ साली स्थापन झाली ग्रामविकास हा शब्द सर्वाना माहित आहे पण त्या शब्दमागे काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज हे व्याख्यान आयोजीत केले असल्याचे सांगितले.
पुढे बोलतांना विनय कानडे म्हणाले, भारत हा खेडयांचा देश आहे आज हि मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या ग्रामीण भागात राहत आहे. जेव्हा इस्लामी आक्रमणच्या पूर्वी भारतात हा काळात स्वतंत्र खेड्यांचा स्वतंत्र देश होता . इस्लामी आक्रमणानंतर तो स्वतंत्र खेड्यांचा पारतंत्र देश झाला , इंग्रजांच्या काळात तो पारतंत्र खेड्यांचा पारतंत्र देश झाला व स्वातंत्र्य नंतर तो पारतंत्र खेड्यांचा स्वतंत्र देश झाला .
आधी खेड्यात सर्व काही उत्पादित होऊन व खेड्यातच विकले जायचे पण इंग्रजांनी कच्या मालावर परदेशात प्रक्रिया करून येथे विकायला सुरवात केली आणि खेड्यातील उद्योग बंद पडण्यास सुरवात झाली व औद्योगिक काळात खेड्यातील लोक शहरात यायला लागली आणि खेडी ओस पडली.
शेतीतीले उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खते, औषधे व विलायती बियाणे आली आणि जमीन नापीक होऊ लागली व जर भारताचा खऱ्या अर्थाने विकास करावयाचा असेल तर आपणास आता परत खेड्याकडे जावे लागेल आणि नैसर्गिक शेतीकडे जावयास लागेल व ह्यासाठी आपणास आपला वेळ व धन देऊन ग्रामविकास कार्यात सहभागी व्हावे लागेल व गावातील सप्तसंपदा भूसंपादा ,जलसंपदा ,वनसंपदा, गोसंपदा , जीवसंपदा , ऊर्जासंपदा व जनसंपदा यांचे संवर्धन, संरक्षण व सदउपयोग करून गावचा विकास करावयास पाहिजे त्यासाठी आपणास गावातील पंचशक्ती म्हणजे धार्मिकशक्ती,युवा शक्ती, मातृशक्ती , सज्जन शक्ती व संघ (विविध संघटना) शक्ती एकत्रित करावयास लागेल असे त्यांनी आवाहन त्यांनी केले.
ह्या कार्यक्रमास नगरसेवक सौ. अपर्णाताई डोके,नगरसेवक सौ. मनीषाताई चिंचवडे ,नगरसेवक अनंत कोऱ्हाळे ,योगेश चिंचवडे, अमोल देशपांडे मान्यवर उपस्थित होते .संस्थेचे खजिनदार योगेश मोकाशी यांनी आभार मानले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

