पिंपरी दि.२२ (सिटीनामा वृत्तसेवा)
पिंपरी चिंचवड शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेमध्ये खंड पडू नये यासाठी वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेतील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येतात त्याच अनुषंगाने महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभाग क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा स्थापत्य विषयक तसेच विद्युत विषयक देखभालीची कामे सुरू असल्याने सोमवार दि.२३ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळचा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा बंद राहील व मंगळवार दि.२४ फेब्रुवारी रोजीचा पाणीपुरवठा कमी दाबाने व अनियमित होईल त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
